रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अमित शाह सोडवणार!

17
Amit Shah Bharat Gogavle Dada Bhuse Aditi Tatkare
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अमित शाह सोडवणार

मुंबई २१ फेब्रुवारी २०२५ : सरकारने १८ जानेवारीला जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली. यामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे गेलं तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलं. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेने दावा केला होता. तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे आहे. मात्र, जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आले होते. यामुळे शिवसेनेत नाराजी पाहायला मिळाली.

शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर उतरून टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी महायुतीत शिवसेनेचे दादा भुसे आग्रही होते. परंतु नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना दिल्याने मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या काही तासातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देऊन एक महिना उलटून गेला तरी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्याशी चर्चा करून पाल्कमंत्रीपदाचा तिढा सोडवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, रुचिता घोसाळकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा