Sanjay Raut Press Conference : दिल्ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी एक विधान करून राजकीय वर्तुळात कल्लोळ निर्माण केला आहे.”ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”,असे वक्तव्य त्यांनी केल होत. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून आता शिवसेना महिला कार्यकर्त्या चांगल्याच पेटून उठल्या आहेत. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन निलम गोऱ्हेंविषयी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत टिपणी केली आहे ती अत्यंत खोचक अशी आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी मला प्रश्न विचारला होता, ही कोणती बाई पक्षात आणली तुम्ही.. निलम गोऱ्हेंच वक्तव्य म्हणजे विकृती. पुढे त्यांच्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली राऊत म्हणाले की, निलम गोऱ्हे म्हणजे निर्लज्ज बाई… काही लोकांच्या मर्जीने त्या आल्या आणि चार वेळा आमदार झाल्या.पण या बाईंचं कर्तृत्व काय? अस संजय राऊत म्हणाले.
माझ्याकडे सर्व पुरावे आहेत – संजय राऊत
दरम्यान, पुण्यातून उमेदवारी देण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी किती पैसे घेतले ? तसेच लक्षवेधी लावायला त्यांनी कीती पैसे दिले. असा सवाल करत संजय राऊतांनी जोरदार टीका केली.माझ्याकडे सगळी माहिती आहे, तेही पुराव्यासह.. हक्कभंग वैगेरे आणा, मी सांगतो, अस म्हणत राऊतांनी ओपन ओपन चॅलेंज दिलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर