Nana Patekar Social Media: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार नाबाद शतक झळकावत पाकिस्तान संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. यातच भारतीय संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेत पाकिस्तान संघाला अखेर स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने सलग दूसरा विजय मिळवत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. विराट कोहलीने चौकार मारत एकदिवसीय क्रिकेटमधील आपले ५१ वे शतक पूर्ण केले.
याच दरम्यान विराट कोहलीच शतक आणि भारताच्या विजयासह सोशल मिडियावर आणखीन एका कलाकार व्यक्तीची चर्चा होताना दिसत आहे. सध्या अभिनेते नाना पाटेकर यांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडलाच असेल की नाना पाटेकर आणि क्रिकेटचा काय संबंध ? सध्या फेसबूक इन्स्टाग्राम व एक्ससह इतर समामाध्यमांवर नाना पाटेकरांचे मिम्स व्हायरल होताना दिसत आहेत. प्रामुख्याने नाना पाटेकरांचे जेवतानाचे फोटो व व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.
अलीकडेच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितले होते की, विराट कोहली जर लवकर बाद झाला तर माझी जेवायची इच्छा होत नाही. दरम्यान आता रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने शानदार शतक झळकावत आपल्या फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे समाज मध्यमांवर चर्चा होऊ लागली आहे की “नाना पाटेकर आज पोटभर जेवणार अशा मिम्स समाजमध्यमांवर व्हायरल होतायात.”
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर