पुणे २७ फेब्रुवारी २०२५ : पुण्यासारख्या शहराला सुशिक्षित असे शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. अशा पुण्यात नेमक चाललय तरी काय हेच समजायच नाव घेत नाहीये. काल स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचर झाल्याची लाजिरवाणी घटना घडली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटले आहे. यामुळे सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून जोरदार टीका होयला सुरुवात झाली आहे. काल शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोर यांनी घटनेचा निषेध म्हणून स्वारगेट डेपोची तोडफोड केली. याबाबत आता पोलिसांनकडून आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
काल स्वारगेट बसडेपो आगारात बलात्कारची घटना घडल्याननंतर आता आणखी एक विनयभंगाची घटना समोर आली आहे. एका आयटी कंपनीत काम करणारी तरुणी कॅबमधून जात आसतान कॅब चालकाने मिररमध्ये पाहून अश्लील चाळे केले. यामुळे तरुणीने घाबरून खडकी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.या घटनेचा तपास करत खडकी पोलिसांनी आता कॅब चालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या घटनेवर आज दिवसभरत अनेक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सूचना करण्यात आल्या आहेत की, संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख ( सहायक वाहतूक अधीक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी विवेक भीमनराव यांना दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर