मोक्का प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! आरोपीला मिळाला जामीन!

14

पुणे २७ फेब्रुवारी २०२५: उत्तमनगर पोलिस ठाण्यात खळबळजनक खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीला विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाला एक नाट्यमय वळण मिळाले आहे.

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, फिर्यादी आणि पीडित महिलांनी आरोपीकडून 10 लाख रुपये घेतले होते आणि त्याबदल्यात पुणे स्टेशनजवळ गाळा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आरोपीने आपले पैसे परत मागितले. त्यामुळेच आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या दाव्याच्या समर्थनार्थ न्यायालयात काही कागदपत्रेही सादर करण्यात आली.

विशेष न्यायालयाने आरोपीला काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. या घटनेमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सत्य काय आहे, हे लवकरच समोर येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा