स्वारगेट घटनेतील आरोपी दत्ता गाडेची कुंडली जाणून घ्या..

153
Datta Gade swargate Crime News Datta Gade History
स्वारगेट घटनेतील आरोपी दत्ता गाडेची कुंडली जाणून घ्या.

पुणे, शिरूर २७ फेब्रुवारी २०२५ : स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. याबाबत आता पोलिस आरोपीचा तपास करत असून पोलिसांच्या हाती आरोपी दत्ता गाडेविषयी सविस्तर माहीती लागली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर याआधी ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका सूत्रानुसार असे देखील सांगितले जात आहे की, हा आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहे. दुसरीकडे आरोपी दत्तात्रय रामदास गाडे मूळचा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवाशी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दत्ता गाडे हा पुणे ते अहील्यानगर अशी प्रवासी वाहतूक करायचा, त्याच्या बद्दल असे देखील सांगितले जात आहे की, वृद्ध महिलांना तो प्रवासी दरम्यान लिफ्ट देयचा आणि त्यांना लुबाडायचा. पोलिसांनी सांगितले की, दत्तात्रय गाडेने २०१९ मध्ये कर्ज काढून चारचाकी गाडी घेतली होती. त्या चारचाकी गाडीतून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतुक करायचा. ज्या महिलेच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा महिलांना तो लिफ्ट देयचा व त्यानंतर त्यांना विचित्र जागी नेऊन त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडून दागिने लुटायचा.

काम धंदा करत नव्हता

आरोपी दत्तात्रय गाडे हा काहीच कामधंदा करत नव्हता, अशी माहिती एका वृत्तवाहीनिने दिली आहे. त्याच्या घरची परस्थिति बेताची असून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील रहिवाशी आहे. गावामध्ये त्याच पत्र्याचं घर आहे. त्याचे आई-वडील शेतामध्ये काम करत असून त्यांची गुटाण गावात तीन एकर जमीन आहे. तर आरोपी दत्ता गाडे याला एक भाऊ आणि पत्नीसह लहान मुले देखील आहेत. अस सगळ कुटुंब असून सुद्धा तो काही कामधंदा करत नसे. त्याला झटपट पैसे कामवायचा नाद लागल्याने तो चोरी आणि लूटमार करायचा अशी माहिती गावातील राहिवाशिनी दिली आहे.

निवडणुकीत सुद्धा उभा राहिला होता..

आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी देखील उभा राहिला होता. पण निवडणुकीत त्याचा पराभव झाला. निवडनुकीच्या काळात तो एका राजकीय नेत्यासाठी सुद्धा काम करायचा अशी देखील माहिती समोर आली आहे.राजकीय पक्षातील नेत्यासोबत त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

त्याचवर दाखल झालेले गुन्हे

आरोपी दत्ता गाडे याने २०२० मध्ये शिरूर मधील करे घाटात लूटमार केली होती. त्याच्यावर दरोडा टाकल्याचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शिक्रापूर येथे दोन, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर गुन्ह्यांतील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर