धनंजय मुंडे आज राजीनामा देणार का? CM देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देण्याचा सल्ला!

64
Dhanajay Munde Dhanajay Munde resign Devendra Phadanvis
धनंजय मुंडे आज राजीनामा देणार का?

Dhananjay Munde Resign Advise CM Devendra Fadnavis: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रात संतापाची लाट उठली आहे. याच दरम्यान काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देवगिरी बंगल्यावर दोन तासाची बैठक पार पडली होती. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या विषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत होती. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे सुद्धा उपस्थित होते. आता याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेना आजच राजीनामा द्या असे सांगितला आहे. पण धनंजय मुंडे आज राजीनामा देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

काल पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. आज या अधिवेशनाचा दूसरा दिवस असून हे अधिवेश धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून गाजणार असल्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्तेचे ८ फोटो आणि १५ व्हिडिओ समोर आले असून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज त्यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मस्साजोग येथे भेट घेतेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर