

Pankaja Munde Reaction : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मूडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यावर आता त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की त्यांनी हा राजीनामा आधीच घ्यायला पाहिजे होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
पकंजा मुंडे यांनी मध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्याबाबत काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले, याविषयी मला जास्त माहिती नाही. पण इन्स्टाग्रामवर मी फक्त एक पोस्ट पहिली, ते व्हिडिओ पाहायची माझी हिंमतही झाली नाही. ज्यांनी त्यांना इतक्या अमानुष पद्धतीने मारले आहे, विशेष म्हणजे त्यांना मारून त्याचा व्हिडिओ त्यांनी केला आहे. याप्रकरणात कोण सहभागी आहे हे केवळ तपास यंत्रणेला माहिती आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, खरतर समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही. पण आजची परिस्थितीच अशी आहे. पण गुन्हेगारला कोणतीही जात नसते, तसंच याबाबत निर्णय घेणाऱ्यालाही कुठलीही जात असता कामा नये. मी मनापासून संतोष देशमुख यांच्या आईची हात जोडून क्षमा मागते. ज्या मुलांनी हे कृत्य केले आहे, हे जर माझी मूल असती तर मी त्यांना कडक शिक्षा करा असच म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली होती की नाही मला माहीत नाही. त्यांच्यापेक्षा मी लहान बहीण आहे. तरी आम्ही वेगळ्या पक्षात काम केल होत. पण तरीही संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या वेदनांपुढ हा काहीही मोठा निर्णय नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपली भूमिका मांडली.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर