महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना मिळणार मोठी भेट; खात्यात जमा होणार..

33
महायुती सरकारची चेंज मेकर ठरलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazhi Ladaki Bahin Yojana) लाभयार्थ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. ७ मार्चपर्यंत पात्र लाडक्या बहीणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ३००० रुपये जमा केले जातील.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना मिळणार मोठी भेट; खात्यात जमा होणार..

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana : महायुती सरकारची चेंज मेकर ठरलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazhi Ladaki Bahin Yojana) लाभयार्थ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. ७ मार्चपर्यंत पात्र लाडक्या बहीणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ३००० रुपये जमा केले जातील. अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, महिलांना आधार मिळवा हाच यामगचा उद्देश असणार आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा १५०० रुपये दिले जातात. परंतु, काही तांत्रिक अडचणीमूळे फेब्रुवारीच्या आठव्या महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहीणींनी चिंता व्यक्त केली होती. मात्र राज्यसरकारने यावर तात्काळ तोडगा काढत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे पैसे एकत्रित पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून पैसे खात्यात न आल्याने चिंता वाढली होती. मात्र,आता पुढच्या २४ ते ३६ तासांत त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा