Pune summer heat alert: पुणेकरांनो, आता सावध व्हा! यंदाचा उन्हाळा लवकरच आणि कडक येणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच पुणेकरांना उन्हाळ्याची झुळूक जाणवली आणि आता मार्चमध्ये तर तापमान ३९ अंशांवर पोहोचले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा फेब्रुवारी महिना गेल्या १२५ वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला आहे.
पुणेकर हैराण, तापमान वाढले;


गेल्या दोन दिवसांत पुणेकरांना थंडीचा अनुभव आला, पण शनिवारी अचानक उन्हाचा तडाखा बसला. शहरातील किमान तापमानातही वाढ झाली असून, कमाल तापमान ३९ अंशांवर नोंदवले गेले. हे तापमान राज्यातील सर्वाधिक होते. पुणेकरांना दिवसा उकाडा जाणवला.
फेब्रुवारीत उष्णता, मार्चमध्ये थंडी
यंदा फेब्रुवारी महिन्यात थंडीऐवजी उष्णता जाणवली आणि मार्च महिन्यात उष्णतेऐवजी थंडी अनुभवायला मिळाली. फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान २२.४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाते, पण यंदा ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
राज्यातील इतर ठिकाणांची स्थिती
विदर्भासह मराठवाड्यातील तापमानही चांगलेच वाढले आहे. कोकणात हवामान विभागाने पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
पुढील काही दिवसांत काय?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत तापमानात चढ-उतार होत राहतील. त्यामुळे पुणेकरांनी उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे