Shama Mohamed Congratulations Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा हंगाम नुकताच संपला आहे. यातच मागच्या दिवसांपूर्वी कॉँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारताच्या कर्णधाराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल होत. त्यांनी स्पर्धेच्या सेमीफाईनल सांमन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला जाड आणि लठ्ठ म्हटले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर त्या चर्चेत होत्या. पण आता काल रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला आणि आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. त्यानंतर शमा मोहम्मद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कर्णधार रोहित लठ्ठ आणि जाड असून त्याला वजन कमी करायची गरज आहे. याशिवाय भारताचा आतापर्यंतचा तो सर्वात अपयशी कर्णधार आहे.’ असे वक्तव्य त्यांनी सोशल मिडिया पोस्टद्वारे केले होते. आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर शमा मोहम्मद यांनी ट्विट करत टीम इंडियाच्या कर्णधारचे अभिनंदन केले आहे. “चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. कर्णधार रोहित शर्माला सलाम, ज्याने पुढे येऊन आपल्या संघासाठी ७६ धावांची अप्रतिम खेळी केली व विजय मिळवला. श्रेयस अय्यर आणि के.एल राहुल यांनी देखील कठीण परिस्थितीत भारताचा डाव सांभाळला. हा लक्षात ठेवण्यासारखा विजय आहे.” असे शमा म्हणाल्या. यानंतर सर्व चाहत्यांकडून त्यांच्यावर मीम्सद्वारे टीका होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर