

Pune Sinhagad Road: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी! सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला उड्डाणपूल एप्रिल महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- लांबी: सुमारे २ हजार १०० मीटर
- प्रारंभ: विठ्ठलवाडी येथील कमानीपासून
- समाप्ती: वडगाव येथे फन टाइम थिएटरसमोर
- या उड्डाणपुलामुळे स्वारगेटकडून धायरी, नऱ्हे,
खडकवासला आदी भागात जाणाऱ्या वाहनचालकांना इनामदार चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल, मोरे चौक, शिवा काशीद चौक या पाच चौकांमध्ये सिग्नलला थांबण्याची गरज पडणार नाही.
कामाची प्रगती
- उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
- सध्या पथदिवे लावणे आणि हिंगणे चौकातील गर्डरवरील डांबरीकरणाचे काम सुरू आहे.
- राजाराम पूल चौकातील सुमारे ६५० मीटर लांबीचा उड्डाणपूल स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वीच खुला करण्यात आला होता.
- आता या प्रकल्पातील सर्वात लांब असलेला उड्डाणपूल पूर्ण होत आला आहे.
नागरिकांना मोठा दिलासा
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे