Auspicious time Holi Puja: आज संपूर्ण जगभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार यावर्षीची होळी १४ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर होळीचे दहन १३ मार्च गुरुवारी करण्यात येणार असून त्यालाच आपण छोटी होळी सुद्धा म्हणतो. हिंदू सणातील हा सर्वात महत्वाचा विधी असून आपल्याकडे होलिका दहन होळीच्या म्हणजेच रंगपंचमीच्या आधी साजरा केला जातो.
हा असेल शुभ मुहूर्त :
होळीचे दहन आज होणार असून त्यासाठी शुभ मुहूर्त फार महत्वाचा असतो. १३ मार्च रोजी दहनाच्या दिवशी भद्राच सावट असणार आहे. तर, भद्राचा वेळ रात्री १०.३० वाजता समाप्त होणार आहे.पंचांगानुसार, होलिका दहनचा शुभ मुहूर्त १३ मार्च रोजी रात्री ११ वाजून २६ मिनिटांपासून ते १२.३० मिनिटांपर्यंत असणार आहे. जवळपास १.०४ मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे.या दिवशी धृति योग, शूल योग असणार आहे. धृति योग दुपारी ०१.०३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, शूल योग पुढच्या दिवशी १४ मार्च शुक्रवारी दुपारी १.२३ मिनिटांपर्यंत असणार आहे.
( टीप : वरील बाबी न्यूज अनकट केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे.)
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर