MI vs GG Highlights WPL 2025 Final :मुंबई इंडियन्सने गुजरात संघाचा पराभव करत वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरात संघाचा ४७ धावा आणि ५ चेंडू शिल्लक ठेऊन पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. यासह संपूर्ण सामन्यात मुंबईच्या संघाची कामगिरी दमदार राहिली. त्यांनी २० षटकांत २१३ धावांचे मोठे लक्ष गुजरात संघासमोर ठेवले होते. मुंबईकडून हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर-ब्रंट या दोघांची दमदार खेळी राहिली. त्यांनी दमदार अर्धशतकाची खेळी केली.
WPL 2025 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल संघ फायनलमध्ये पोहोचला असून त्यांचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स सोबत रंगणार आहे.गुजरात विरुद्धच्या एलिमीनेटर सामन्यात मुंबईचे सर्वच खेळडू जोरदार फॉर्मात होते. त्यामुळे अंतिम सामना सुद्धा अटीतटीचा पहायला मिळणार आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या आयपीयल संघाचे खेळाडू आणि स्टाफ तिलक वर्मा,कायरन पोलार्ड यांनी उपस्थिती लावली होती.
मुंबईने दिलेल्या २१४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात संघाची सुरुवात खूप खराब झाली. त्यांचा संघ १६६ धावांवर ऑल आउट झाला. गुजरातकडून पहिल्याच षटकात बेथ मुनी ६ धावा करत बाद झाली. तर हरलीन देओल ८ धावा करत धावबाद झाली. तर डॅनियल गिब्सनदेखील ३४ धावांवर धावबाद झाली.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना WPL २०२५ च्या प्लेऑफमधील मोठी धावसंख्या उभारली. मुंबईकडून हिली मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांनी १३३ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने २२३ च्या वादळी स्ट्राईक रेटने १२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर