Shashank Singh’s statement on not giving strike to Shreyas Iyer: पंजाब किंग्स विरूद्ध गुजरात जायंट्स या आयपीएल २०२५ मधील पाचव्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाने गुजरात जायंट्सवर ११ धावांनी विजय मिळवत या हंगामातील आपले पहिले खाते उघडले. पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्सने आपली ताकद दाखवून दिली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सने आयपीएल मधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. पंजाबने २० षटकांत ५ गडी गमावून तब्बल २४३ धावा केल्या.
या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने गुजरातच्यान गोलंदाजच्या ठिल्या उडवल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रेयसने नाबाद ९७ धावांची दमदार खेळी केली. त्याने ४२ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकाऱ्यांच्या मदतीने ९७ धावा केल्या. पण श्रेयसचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. यामागे कारणीभूत ठरला त्यांच्याच संघातील शशांक सिंग. शशांकने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत श्रेयसला स्ट्राईक दिली नाही आणि त्यामुळे श्रेयसचं शतक हुकलं. पण याबबात शशांकने सामना संपल्यावर मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला शशांक सिंग ?
“होय, हा एक चांगला कॅमिओ होता. पण श्रेयसची फलंदाजी पाहून मला आणखी प्रेरणा मिळाली. खरं सांगायचं तर श्रेयस मला पहिल्याच चेंडूपासून म्हणाला होता, माझ्या शतकाचा विचार करू नकोस, तु तुझ्या गेमकडे आणि फटकेबाजीकडे लक्ष दे.”पुढे शशांक म्हणाला की, “मी चेंडू पाहतो आणि खात्रीशीर चौकार मारायचा प्रयत्न करतो. मला माहित आहे की मी कोणते फटके खात्रीशीर खेळू शकतो. मी करू शकत नसलेल्या गोष्टींपेक्षा मी माझ्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो.” असे शशांक म्हणाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर