Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे उद्यापासून (दि. ३०) गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवाला उत्साहात सुरुवात होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा, ऑर्केस्ट्रा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे, यासाठी उत्सव समितीने विशेष यंत्रणा उभारली आहे.


उत्सवातील प्रमुख कार्यक्रम :
रविवार (दि. ३०)
- पहाटे महाअभिषेक
- संध्याकाळी छबिना पालखी
- रात्री घोरावडी स्टेशन मैदानात मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा
- श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणात श्री गुरुदेवदत्त प्रासादिक नाट्यरूपी रंगीत संगीत भजनी भारुडाचा कार्यक्रम
रविवार आणि सोमवार (दि. ३० आणि ३१)
- गणपती माळ येथे बैलगाडा शर्यत: विजेत्यांना १ लाख २५ हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे, तसेच टू व्हीलर, एलसीडी टीव्ही, कूलर आणि चषक मंगळवार (दि. १)
- दुपारी ३ ते रात्री ७ वाजेपर्यंत भोईआळी मळा येथील मैदानात निकाली कुस्त्यांचा आखाडा: एकूण इनाम ८ लाख ८ हजार ८८८ रुपये बुधवार (दि. २)
- रात्री ८ वाजता मारुती मंदिर चौक (डीपीरोड) येथे लावणी सम्राज्ञी सिनेतारका राधा पाटील मुंबईकर यांचा गाण्याचा कार्यक्रम गुरुवार (दि. ३)
- रात्री ८ वाजता श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणात संदीप कर्नावट निर्मित आणि दिग्दर्शित ऑर्केस्ट्रा ऑल द बेस्ट हा मनोरंजनाचा कार्यक्रम
श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे शहर भक्तीमय वातावरणात रंगून जाणार आहे. या उत्सवातील विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष अविष्कार अशोक भेगडे आणि प्रसिद्धीप्रमुख अभिषेक राजेंद्र बुट्टे यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे