मतमोजणी सुरू, सुरुवातीचे कल झामुमो आघाडीच्या बाजूने

रांची: झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवातझाली आहे. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता असणार आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. झारखंड विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एग्झिट पोलनुसार झारखंड राज्यात त्रिशंकू विधानसभा निर्माण होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळी ८ वाजण्यापासून सुरू झाले आहेत.

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाल्यानंतर तासाभरात या निकालाचे कल हाती येणे सुरू झाले आहे. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांपैकी ७१ जागांचे कल हाती आल्यानंतर काँग्रेस-आघाडीची ४० जागांवर मुसंडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा