साताऱ्यात भूकंपाचे धक्के

सातारा: सातारा जिल्ह्यात कोयना परिसरात आज सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांच्या सुमाराला सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी २० डिसेंबर या दिवशी दिल्ली-एनआरसीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसले. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हरयाणा, पंजाब, काश्मीर आणि दिल्ली एनआरसीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

सातारा जिल्ह्यात जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. कायना परिसरासह हे धक्के कोकण किनारपट्टी परिसरातही जाणवले. कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवायला सुरुवात झाल्याबरोबर लोक तातडीने प्रसंगावधान राखत घराबाहेर आले. त्यानंतर बराच काळ लोक रस्त्यांवर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा