सावधान,पिंपरी चिंचवड पोलिसांचा सोशल मीडियावर ‘वॉच’; गैरप्रकार केल्यास होणार कारवाई!

11
Pimpri-Chinchwad Police tighten social media surveillance. Action against fake accounts, offensive content, and cybercrime. Stay alert online.
गैरप्रकार केल्यास होणार कारवाई;

PimpriChinchwad Police Warn on Social Media Misuse: सोशल मीडियाच्या जगात वावरताना आता जरा जपून; व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामसारख्या माध्यमांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर असणार आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट आणि गैरकृत्ये करणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे. आयुक्तालयात नव्याने सुरू झालेल्या सोशल मीडिया सेलमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण याचा सकारात्मक कामांसाठी उपयोग करत असले, तरी काही लोक फसवणूक, अफवा पसरवणे आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी गैरवापर करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. सोशल मीडिया सेल अशा गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

या सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर होणारी दमदाटी, अश्लील संभाषण, मेसेज, फोटो आणि व्हिडिओंचे प्रसारण, फेक अकाउंट बनवून फसवणूक आणि अफवा पसरवण्यासारख्या कृत्यांवर कठोर पाऊल उचलले जाणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया वापरकर्त्यांना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सोशल मीडियाचा वापर आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक चांगली कामे याद्वारे होत असली, तरी त्याचा वापर करताना दुसऱ्या व्यक्ती किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. फेक अकाउंट बनवून गैरकृत्ये करणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गैरवापर करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे