बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात ‘मायनॉरिटी युथ पार्लमेंट’चे भव्य आयोजन

17
Minority Youth Parliament
‘मायनॉरिटी युथ पार्लमेंट’

Minority Youth Parliament held in Pune on Ambedkar Jayanti:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुल येथे ‘मायनॉरिटी युथ पार्लमेंट’ अर्थात युवा अल्पसंख्याक संसद या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या शिक्षण, रोजगार, आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरण या विषयांवर विविध सत्रांद्वारे सखोल चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व धर्मगुरू यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये बिहारचे खासदार मा. श्री पप्पू यादव, काश्मीरचे खासदार मा. श्री मोहीबुल्लाह नदवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा. श्री हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा. श्री अंबादास दानवे, माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, मुस्लिम धर्मगुरू मा. कार्य साहेब, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष मा. मोहन जोशीजी, हाजी अरफात शेख, ख्रिश्चन धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष श्री महेबुब शेख, ख्रिश्चन नेते पीटर डिसूजा, NSUI चे माजी अध्यक्ष ॲड.अमीर शेख, युवा नेते पाहत अहमद व उमेश चव्हाण, तसेच आदी प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होती.

या कार्यक्रमात धोरणात्मक विचारमंथन, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील संधी, युवकांसाठी सामाजिक विकासाच्या योजना आदी विषयांवर परिसंवाद झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग नोंदवला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर