MI vs CSK Rohit Sharma Frist Fifty IPL2025: आयपीएल २०२५ चा ३८ वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. वानखेडे स्टेडीयमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने तब्बल 3 वर्षानी चेन्नईचा पराभव केला. अगदी पहिल्या षटकापासून रोहित शर्मा दमदार लयीत दिसत होता.रोहितने ४५ चेंडूत ७६ धावा केल्या. ज्यात ६ षटकार व ४ चौकरांचा समावेश होता. या खेळीसह रोहित शर्मा जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे.
रोहित शर्माने या हंगामातील पहिले अर्धशतक जळकावले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदाणात उतरलेल्या चेन्नईने १७६ धावांचे लक्ष मुंबई समोर ठेवले हीते. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने चेन्नईवर ९ विकेट्सने विजय मिळवला. यंदाच्या सीजनमध्ये मुबईचा सलग तिसरा विजय होता. रोहित शर्माची दुसऱ्या विकेट्ससाठी सूर्यकुमार यादवने साथ दिली. सूर्याने ३० चेंडूत ५ षटकरांच्या व ६ चौकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात चांगली राहिली नाही.त्यांनी आपली विकेट्स रचिन रविद्रच्या स्वरूपात लवकर गमावली. यानंतर आयुष म्हात्रेने १५ चेंडूत ३२ धावांची शानदार खेळी केली. रवींद्र जाडेजा आणि शिवम दुबे या दोघांनी अर्ध शतक ठोकत चेन्नईला चांगल्या लक्षापर्यंत पोहोचवले. पण चेन्नईचे गोलंदाज मुंबईच्या फलंदाजांच्या विकेट घेण्यात अपयशी ठरले.
न्यूज अनकट प्रतीनिधी,प्रथमेश पाटणकर