युरोपला जाण्यासाठी व्हिसा मिळाला नाही त्यामुळे काश्मीरला गेले अन होत्याच नव्हत झालं

14
Vinay Narwal died in Pahalgam Attack
युरोपला जाण्यासाठी व्हिसा मिळाला नाही त्यामुळे काश्मीरला गेले अन होत्याच नव्हत झालं

Vinay Narwal died in Pahalgam Attack: काश्मीरच्या पहलगाम येतील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मंगळवारी भ्याड हल्ला केला. यामध्ये 28 निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. याच दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय नौदलाच लेफ्टनंट पदावर असलेल्या विनय नरवाल यांचाही समावेश होता. विनय नारवाल (Vinay Narwal) आणि हिमांशी नरवाल(Himanshi Narwal) यांच अवघ्या काही आटवड्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यानंतर ते हनिमून साठी काश्मीर मधील निसर्गरम्य अशा पहलगामध्ये आले होते. मात्र, दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांनी गोळी घालून ठार केले.हिमांशी नरवाल यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार एका व्हिडीओत सांगितला काल सोशल मेडियावर ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. दरम्यान आता आणखी नवीन माहिती समोर आली आहे.

बुधवारी दिल्ली विमानतळावर लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाला भारतीय नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी हिमानशी नरवाल यांनीही आपल्या पतीला शेवटची मानवंदना दिली. यानंतर विनय नरवाल यांच्या पार्थिवाला त्यांची बहीण आणि वडिलांनी मुखाग्नी दिली.

व्हिसा मिळाला नाही म्हणून विनय- हिमाशी काश्मीरला गेले :

लग्न झाल्यानंतर आधी फिरण्यासाठी विनय आणि हिमांशी युरोपला जाणार होते.पण, शेवटच्या क्षणी त्यांना व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना जम्मू-काश्मीरला यावे लागले. लग्न झाल्यावर त्यांनी युरोपला जाऊन हनिमून करायचा प्लॅन केला होता. व्हिसासाठी त्यांनी अर्ज देखील केला होता. पण ऐनवेळी व्हिसा मिळू शकला नाही आणि युरोपला जाण्याचा त्यांचा प्लॅन रद्द झाला. दिनांक 21 एप्रिल रोजी ते जम्मू-काश्मीरला रवाना झाले. 22 एप्रिल रोजी ते पहलगाम मधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेवण केल्यानंतर, ते फिरण्यासाठी गेले. त्यावेळी बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या झाडून ठार केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर