Rakhi Sawant controversy Statement: एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यातील वाद पेटला आहे. तर दुसरीकडे सतत काहीना काही कारणावरून चर्चेत येणारी बॉलीवूड क्वीन राखी सावंत हिला भारताच्या विरिधात वक्तव्यकरण खूप महागात पडल आहे.यामुळे राखी सावंत अडचणीत आली आहे. यावेळी तिने चक्क पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे भारतीय राखीच्या विरोधात चांगलेच पेटून उठले आहेत. याशिवाय मनसेकडून कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.
22 एप्रिलला जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम हल्ला झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.अशातच राखी सावंतने असे वक्तव्य केले. ज्यामुळे ती वादाच्या तडक्यात सापडली आहे. तिने पाकिस्तानला सपोर्ट केला असून भारतीय आता तिला देशातून बाहेर काढण्याची मागणी करीत आहेत.
काय म्हणाली राखी सावंत :
राखी सावंतचा सोशल मेडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यात राखी सावंत म्हणाली की, मी राखी सावंत, मी खर बोलतेय, खऱ्याशिवाय एकही गोष्ट मी खोट बोलणार नाही. मी पाकिस्तानवल्याना सांगते की, पाकिस्तानवालो मी तुमच्यासोबत आहे. याशिवाय ती पुढे म्हणाली की, जय पाकिस्तान ! असे केलेल्या वक्तव्यामुळे तिला देशातून बाहेर काढण्याची मागणी मनसे कडून करण्यात आली आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या कमेन्टमध्ये एका चाहत्याने लिहिले आहे. की, भारतात राहून अस बोलते. हिच्या घरावर जेसीबी चढवा, तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, सरकारने हीच नागरिकत्व रद्द कारव आणि तिच्यावर देशद्रोहचा खटला दाखल करून कारवाई करावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर