भरारी स्वप्नांची! शिक्रापूरची समृद्धी बनली पहिली व्यावसायिक महिला पायलट.

30
A stubborn bud from the soil of Shikrapur has blossomed into the sky
तीव्र शक्तीच्या बळावर व्यावसायिक पायलट बनण्याचे स्वप्न साकार केले आहे.

A stubborn bud from the soil of Shikrapur has blossomed into the sky:शिक्रापूरच्या मातीतील एका जिद्दीच्या कळीने आकाशाला गवसणी घातली आहे. येथील होतकरू युवती समृद्धी शेखर करंजे हिने आपल्या कठोर परिश्रमातून आणि तीव्र शक्तीच्या बळावर व्यावसायिक पायलट बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे, शिरूर तालुक्यातून व्यावसायिक महिला पायलट बनण्याचा बहुमान समृद्धीने मिळवला आहे, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाची आणि अभिमानाची लाट पसरली आहे.

तीव्र शक्तीच्या बळावर व्यावसायिक पायलट बनण्याचे स्वप्न साकार केले आहे.

समृद्धीच्या या यशोगाथेचा प्रवास बिशप स्कूल, उंड्री येथून सुरू झाला. तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वाघोली येथील लेक्सिकॉन स्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या समृद्धीने बारामती येथील कार्व्हर एव्हिएशनमध्ये पायलट प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिने दोन वर्षे अथक परिश्रम आणि कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि नुकतीच एका प्रतिष्ठित विमान कंपनीत व्यावसायिक महिला पायलट म्हणून तिची निवड झाली आहे.

आपल्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल बोलताना समृद्धी म्हणाली, माझ्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझे वडील शेखर करंजे आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मला खूप पाठिंबा दिला. जर एखाद्या व्यक्तीने शालेय जीवनापासूनच एखादे ध्येय निश्चित केले आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवली, तर तो निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.

समृद्धीच्या या प्रेरणादायी प्रवासाने अनेक तरुणींना नवी दिशा आणि स्वप्ने पाहण्याची हिंमत दिली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिक्रापूर आणि परिसरातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे