भारतात लोकांना थेरेपी घेण्याची लाज वाटते?

33
Do you know yourself completely
भारतात लोकांना थेरेपी घेण्याची लाज वाटते?

Do you know yourself completely:तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखता का? तुमचा तुमच्या रागावर, भावनांवर ताबा आहे का? तुम्ही कधी-कधी गोंधळून जाता का? या सगळ्याची उत्तरे नाही असतील किंवा तुम्हाला जर स्वतःला अधिक समजून घ्यायच असेल तर तुम्हाला थेरपीची गरज आहे ..

घाबरलात का? अनेकांना ‘थेरपी’ या शब्दाचीच मोठी भीती वाटते, पण मंडळी थेरपी म्हणजे काही अवघडवणारी गोष्ट नाही. चला आज सोप्या शब्दात समजून घेवूयात थेरेपीबद्दल…

या धावपळीच्या जीवनात, आपण स्वतःला कामाकडे पूर्णपणे झोकून दिले आहे. याचा नकारात्मक परिणाम आपल्या दैनंदीन जीवनात होतो. जस की आपण आपल्या आयुष्यातले सोपे निर्णय घेताना गोंधळतो किंवा या कामाच्या धावपळीत आपण आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना हवा तेवढा वेळ देत नाही. याचा परिणाम म्हणजे आपल्याला एकलकोंडेपणा जाणवतो पुढे एकलकोंडेपानच रूपांतर डिप्रेशन आणि एंजायटी मधे होऊ शकत.

हा एकलकोंडेपणा आणि गोंधळेपणा दूर करण्यासाठी थेरपीची गरज भासते. बऱ्याच लोकांना वाटते की थेरेपी फक्त ‘वेड्या’ लोकांसाठी किंवा ज्यांना गंभीर मानसिक आजार आहेत त्यांच्यासाठी आहे; पण थेरेपी ही आपल्याला आयुष्याकडे बघण्याची एक वेगळी दिशा देते. तरीही लोक थेरपी का टाळतात? आज आपण याच विषया संदर्भात माहिती घेणार आहोत. तर चला पाहुयात .

थेरेपिस्टकडे जाणे म्हणजे आपण “काहीतरी कमी आहोत” किंवा “आपल्यात दोष आहे” असं मानले जाते. यामुळे थेरेपी घेण्याची गरज असणारे लोकही थेरेपीपासून दूर राहतात, कारण त्यांना समाजातून टीका किंवा हेटाळणी होण्याची भीती वाटते.

भारतात थेरेपिस्टकडे जाणे किंवा मानसिक आरोग्याबाबत बोलणे याला अजूनही “लाजिरवाणे” मानले जात “लोक काय म्हणतील” म्हणून बरेचजण थेरेपी घेण्यास टाळतात.

बऱ्याच जणांना अस वाटते की थेरेपिस्टकडे जाणे म्हणजे “बाहेरच्या व्यक्तीला” आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश देणे आणि हा थेरेपीच्या बाबतीतला सर्वात मोठा गैरसमज आहे.

आधी थेरेपी म्हणजे काय?
थेरपी म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलून, त्यांच्या समस्यांचे कारण समजून घेऊन आणि त्यांना त्या समस्यांशी सामना करण्यास मदत करणे म्हणजे थेरपी. तुम्ही तुमच्या भावना थेरपिस्टकडे मोकळेपणाने व्यक्त करता आणि थेरपिस्ट तुम्हाला समजून घेतो आणि तुमच्या मनाला हलक करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स शिकवतो.

थेरेपी चे खरंच फायदे होतात का?
थेरेपीचे खरंच अनेक फायदे होतात. अनेकदा आपल्याला का राग येतो, का दुखी वाटते किंवा का असुरक्षित वाटते? याची कारणे आपल्याला माहीत नसतात. थेरपिस्टकडे बोलताना आपण आपल्या भावनांचे मूळ शोधू शकतो. यामुळे व्यक्तीला स्वतःबद्दल एका प्रकारची जागरूकता येते आणि ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. ही जागरूकता आयुष्यातील निर्णय घेताना आणि नातेसंबंध सुधारण्यास मदत करते.

थेरेपी फक्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाही; तर वैयक्तिक विकासासाठीही उपयुक्त आहे. अनेक लोक थेरेपी घेतात कारण ते स्वतःला अजून चांगले समजून घेऊ शकतील आणि त्यांचा पर्पज ऑफ लाईफ स्पष्ट होईल. बऱ्याच लोकांना थेरेपीचे फायदे हे जाणवत आहेत आणि ते वारंवार थेरपी घेण्या कडे वळत आहेत.

थेरेपीची काही आव्हाने देखील आहेत
काही लोकांना सुरुवातीला थेरेपी उपयुक्त वाटत नाही कारण त्यांना योग्य थेरेपिस्ट सापडत नाही; तर स्वतःसाठी एक योग्य थेरेपिस्ट निवडा जो तुमची गरज आणि समस्या नीट समजून घेऊ शकेल. थेरेपीसाठी थोडा संयम ठेवणे ही खूप गरजेचे आहे कारण थेरेपीही एक प्रक्रिया आहे ती त्वरित परिणाम देणार औषध नव्हे.

थेरेपी संदर्भात सध्याच्या धकाधकीच्या युगात जागरूकता निर्माण करण अत्यंत गरजेच आहे. त्यासाठी काय करांव…

शाळा, महाविद्यालये आणि सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण गरजेचे आहे. सेलिब्रिटी व्यक्ती किंवा एका प्रसिद्ध व्यक्तीने मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने बोलण आवश्यक आहे. त्यामुळे सामान्य लोकांना थेरेपी घेण्यास लाज वाटणार नाही आणि थेरपीच्या विषयी असलेला गैरसमज कमी होईल. सरकार आणि खासगी संस्थांनी परवडणारी आणि सर्वांना उपलब्ध असणारी थेरेपी सेवा देण्यासाठी पावल उचलली पाहिजेत. म्हणजे सामान्य लोकांना थेरेपी ही एक लक्झरी आहे अस वाटणार नाही.

भारतात थेरेपीबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत ज्यामुळे लोक मानसिक आरोग्यासाठी थेरेपी घेण्यास टाळाटाळ करतात; परंतु थेरेपी ही केवळ मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठीच नाही, तर वैयक्तिक विकास, भावनिक जागरूकता आणि जीवनातील स्पष्टता मिळवण्यासाठीही गरजेची आहे. योग्य थेरेपिस्ट आणि संयमाने थेरेपीचे अनेक फायदे मिळू शकतात. यासाठी समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, सेलिब्रिटींनी याबाबत खुलेपणाने बोलणे आणि परवडणाऱ्या थेरेपी सेवांची उपलब्धता वाढवणे गरजेचे आहे. थेरेपीला लाजिरवाणे समजण्याऐवजी तिला स्वतःच्या मानसिक कल्याणासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून स्वीकारल पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी -जुई काळे