Is the craze for online education declining: Byju’s या ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्मबद्दल तर सगळ्यांनाच माहिती असेल किंवा बऱ्याच विद्यार्थांनी या प्लॅटफॉर्म वरून कोचिंग घेतल ही असेल. लॉकडाउनच्या काळात मात्र Byju’s चा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत होता. बरेच विद्यार्थी हे घरबसल्या Byju’s ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून कोचिंग घेत होते; पण 2023 पासून Byju’s जो एकेकाळी महत्वाचा मानला जाणारा प्लॅटफॉर्म होता, तो आता जवळजवळ कोसळण्याच्या मार्गावर आलाय.
Byju’s ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या या परिस्थितीचे कारण लॉकडाउन संपल्यामुळे चालू झालेले ऑफलाईन क्लासेस आहेत का? का Byju’s हा एक फक्त पर्याय म्हणून वापरला गेला होता? फक्त लॉकडाउनपुरता! आता डिजिटलच्या काळात आपण ऑनलाईन पद्धतीकडे जास्त जोर देत आहोत पण ही ऑनलाइन पद्धत शिक्षण क्षेत्रात लागू होऊ शकते का आणि जर लागू होते तर त्यात काही बदल करण्याची गरज आहे का? का ऑफलाईन पद्धती याच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट आहेत?
खरंतर byjus हे केवळ एक प्रतीकात्मक उदाहरण आहे . मात्र अशीच काहीशी परिस्थिति आपल्याला इतर ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मबद्दल आढळून येते. मग जर आत्ता पुन्हा ऑफलाइन शिक्षणाकडे परत सगळे वळत असतील तर काय ऑनलाइन पद्धती केवळ ऑप्शन होती का ? तर पाहुया, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि जाणून घेवूयात ऑनलाइन शिक्षण पद्धतीबद्दल ..
ऑनलाइन क्लास हे ऑफलाईनपेक्षा दर्जेदार आहेत का? हा मुळात सर्वांनाच पडलेला मोठा प्रश्न असतो, तर ऑनलाइन शिक्षणासाठी चांगलं इंटरनेट डिव्हाइस आणि शांत जागा ही गरजेची असते; पण भारतात अजूनही बऱ्याच ठिकाणी इंटरनेटच्या सुविधा पूर्णपणे उपलब्ध नाही. यामुळे बऱ्याच विद्यार्थांना ऑनलाइन क्लासेसमध्ये अडथळा येतो. शिवाय ऑनलाइन क्लासेसमुळे स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. ऑफलाइन क्लासेसमध्ये मित्रांशी गप्पा, ग्रुप स्टडी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधता येतो. यामुळे मुलांची कम्युनिकेशन स्किल्स वाढते आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास देखील वाढतो. तुम्हाला वाटत असेल की या कारणामुळे ऑनलाइन शिक्षण हे पूर्णपणे थांबले आहे की काय? तर ऑनलाइन शिक्षण हे पूर्णपणे थांबलेलं नाहीये.
जसे याचे तोटे आहेत तसा या ऑनलाइन पद्धतीचा फायदा देखील आहे. ज्या विद्यार्थ्यांना वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा आहेत जसे की काही विद्यार्थी हे पार्ट टाईम जॉब करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोर्सेस अजूनही सोयीचे आहेत आणि ऑनलाइन क्लासेसमुळे पालकांचा भार देखील हलका होतो. पालकांना मुले क्लासेसपर्यंत सुरक्षित पोहोचली का? हा ताण किंवा त्यांना सोडायला-आणायचा त्रास देखील कमी होतो. आता तर बऱ्याच क्लासेसने हायब्रिड मॉडेल सुरु केले आहे.
हायब्रिड मॉडेल म्हणजे काय?
हायब्रिड मॉडेलमध्ये काही क्लासेस ऑनलाइन आणि काही ऑफलाइन घेतले जातात किंवा जे ऑफलाईन शिकवले आहे त्याचा व्हिडिओ हा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात. यामुळे विद्यार्थांना कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाईन क्लासेस अटेंड करता येतात. खरतर ऑनलाइन शिक्षणाचा क्रेझ काहीसा कमी झाला आहे, विशेषतः ऑफलाइन पर्याय उपलब्ध झाल्यामुळे पण तो पूर्णपणे संपलेला नाही. ज्यांना वेळेची बंधने असतात आणि कमी खर्चात शिक्षण हवं आहे ते लोक अजूनही ऑनलाइन शिक्षणाकडे वळतात.भविष्यात हायब्रिड मॉडेल जास्त लोकप्रिय होईल असा अंदाज लाऊ शकतो कारण हायब्रिड मॉडेल हे सर्व विद्यार्थांसाठी आणि पालकांसाठीसुद्धा सोईचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे