Bappa Joshi comeback after illness: मराठी मनोरंजन विश्वातले सर्वांचे लाडके बाप्पा जोशी (विद्याधर जोशी) गेला बराच काळ अभिनय क्षेत्रापासून दूर होते.कारण विद्याधर जोशींना फायब्रॉसिस हा गंभीर आजार झाला होता. या गंभीर आजारामुळे बाप्पा जोशी यांना सतत दम लागायचा,त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होत होता. महिन्याभरानंतर विद्याधर जोशींचा हा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यांचं ६०%फुफ्फुस निकामी झालं. त्यामुळे त्यांना त्यांची चालू असलेली मालिका देखील सोडावी लागली.पुढे डॉक्टरांनी त्यांच्या फुफ्फुसांवर शस्त्रक्रिया करून ऑपेरेशन केलं त्यानंतर विद्याधर जोशींची तब्येत आत्ता व्यवस्थित आहे.
मनोरंजन विश्वातील सर्वांचे लाडके बाप्पा जोशी त्यांच्या या गंभीर आजारावरून यशस्वीरीत्या मात करून तब्बल ३ वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत.पु.ल.देशपांडे यांच्या “सुंदर मी होणार” गाजलेल्या नाटकातून बाप्पा पुन्हा एकदा रंगभूमीवर पुरागमन करतायत. इतक्या मोठ्या आजारपणांनंतर रंगभूमीवर परतण्याची धाकधूक त्यांना आहे.परंतु रंगभूमीवर पुन्हा एकदा काम करण्यास ते तितकेच उत्सुक आहेत.अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आणि बाप्पा जोशींना पुन्हा एकदा रंगभूमीवर पाहता येणार म्हणून त्यांचे चाहतेही तितकेच उत्सुक आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर