महाराष्ट्र अपडेट | News Uncut | Marathi | Live Updates

16

Maharashtra Update Marathi Live News: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!
पुणे-पंढरपूर महामार्गावर बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दिव्यांगांनी रस्ता अडवला.
आमदार सुरेश धस यांनी शिवमहापुराण कथेने सर्व रेकॉर्ड तोडल्याचा दावा केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी महाराष्ट्रभर
चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली.
गंगापूर तहसीलमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने ‘खाली डोके, वर पाय’ आंदोलन केले.
आरबीआयने एमपीसी बैठकीचे वेळापत्रक बदलले. सासवड येथे आचार्य अत्रे पुरस्कारांचे वितरण झाले.
‘मसिआ’ स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत ‘BUSINESS का CHAMPION’ सेमिनार आयोजित.
भंडाऱ्यातून पंढरपूरला सायकलवारी निघाली, रोटरी क्लब भंडारा आणि बायसिकल ग्रुपच्या 9 जणांचा सहभाग.
गोंदियाच्या देवरीत हॉटेल मालकाने जखमी हरणाच्या पिल्लाला वाचवले. छत्रपती संभाजीनगरात 76 गॅम्बलरांना अटक. भंडाऱ्यात वादळी वारे आणि पावसामुळे कारल्याची शेती उद्ध्वस्त.
नागपूरच्या लोकमत चौकातील गोवारी पुलावर अपघाताचा धोका.
या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती जाणून घ्या!