विकीर

तुझ्यासाठी कायपणं !

काय करू सुचत नव्हतं. सगळे हळू हळू ऑफिस मधून गेले होते. हेतल आणि घंटाचा आवाज, आवाज कसला कुजबुज, कानात माशी गुणगुणल्यासारखी येत होता. शेवटी तोही येणं बंद झाला होता. मध्ये मध्ये लिफ्ट आवाज यायचा तेव्हा वाटायचं कि हो कोणी ना कोणी तरी जिवंत आहे आजूबाजूला. आता या जगातून त्या जगात जायला उठलो. पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि सारिका मावशी गाडी दिसली, हेल्मेट होत डोक्यावर तरी तोंड लपवलं. आईला न सांगता गाडी घेऊन येणं म्हणजे चोरून गर्लफ्रेंडला घेऊन येण्यासारखंच. आज काळ्या हेल्मेटमुळे आज मी तोंड काळ करून आणि तोंड लपवून बिल्डिंगपर्यंत आलो होतो. माझीच गाडी तरी चोरून कोणाची तरी आणल्यासारखं झालं होत.गेट जवळ आल्यावर वॉचमनं ने सलाम ढोकला तेव्हा कळलं आयला गाडी आपलीच आहे.

घरात पाय ठेवला आणि आईचा कॉल आला, हिला कळलं आता बोलणी खायला लागणार, उचलू कि नको विचार करेपर्यंत कॉल कट झाला. आणि लगेचचं श्रियाचा कॉल आला आता काय करू?
लगेच उचलला, समोरून आई – काय रे, कुठेसं? कधीचा कॉल करतेय श्रियाचा लगेच उचलास ?
अगं आई बाइकवर हॊतॊ, तशी दाताखाली जीभ चावली? आई खूप भडकली

आता गाडी नेणं शक्य नव्हतं काही दिवस.
प्रेमभंग, जाहीर प्रेम भंग झाला होता.

दुसऱ्या दिवशी बस स्टॉपवर उभा होतो, बस काही येत येत नव्हती, जी येत होती ती माझ्या काही कामाची नव्हती. स्टॉप शेजारीच एक जण गाडी थांबवून एका आजीला उतरवत होता, स्टॉप मागच्या बिल्डिंग मध्ये घर असावं कदाचित, आजी उतरता अन ट्रॅफिक मधून रस्ता काढत एक बाईक वाला कचकन ब्रेक दाबून , थेट आजीच्या पुढ्यात! आजी भयंकर घाबरली, लोक जमली, बाईकवाला इतक्यात पसार पण झाला होता. जनतेचा नंतर जो मोर्चा वलाला तो बाईक वाल्यांवर. कसे चालवतात पासून ते बंद केल्या पाहिजेत बाईक रस्त्यावरपर्यंत. जनतेचे बरेच पर्याय आले होते.

मला राहवलाच नाही, गर्दी बाजूला सारत शर्टचे हात वर करत त्या गराड्यात घुसलो, चेवचवाने बोलू लागलो, काय कळत का आधी बाईक आणि रायडर च नातं? नवरा बायको, प्रीयसी प्रियकराच्या वर आहे त्यांच्यातलं नातं! असाही इतिहासच आहे तुमच्या सारख्या लोकांचा दोन प्रेम करणाऱ्यांच्या मधे यायचा. आजी उतरत होती तर तिच्या मुलाने तो दरवाजा उघडायला यायचं ना? पार्किंग लाईटस ऑन केल्या होत्या का त्याने? किती नि:ष्काळजी पणा हा? आणि दोष कोणाला ? तर बाईक चालवणाऱ्याला ? बर सगळ्याच बाईक चालवणाऱ्यांना ? हा तुमचा न्याय?

काय काळात तुम्हाला नातं आमच? किती सहन करावा लागत माहितेय?
मनसोक्त कुठे जात येत नाही तिला घेऊन, हे चार चाकचे हत्ती असतात सगळा रास्ता अडवून. नाही तर कुत्री मांजरी आणि माणसांची मुलं भटकत असतात, का रे तुम्हाला तुमच्या मुलांचा हि हात पकडत येत नाही का? अर्जंट ब्रेक मारतात ना पडलो कि लागत आम्हाला? आमचा जाऊ द्या पण आमचं बाईक उगाच स्क्रॅचेस येतात ना?

पेंडिंग डेन्टिनचा त्रास होतो तिला?

बराच काही उरात हलकं करत असताना हि नालायक दुनिया मला न बघताच काही रिऍक्ट न करताच, बसच्या दिशेने निघून गेली. पण

चार पाच बाईक वाले त्या गर्दी मागे गाडी उभी करून बघून स्लोमोशन मध्ये माझ्या कडे बघून टाळ्या वाजवत होते.

तास जोरात हॉर्न वाजला, अरे विकीर? – सारिका मावशी. मी भानावर आलो

अरे ऑफिसला चाललास ना? चल सोडते मी, तुझ्या बाजूचाच ब्लॉक आहे माझा.

तसा मी गाडीत बसलो. एसी वाढवं हवं तर म्हणता सारिका मावशी माझ्या जॉब च विचारात होती. मी पण जपून जपून बोलत होतो, सारिका “माझ्या आईची खबरी” मावशी.

ट्राफिक मधून पोहत आम्ही थोडं थोडं पुढं जात होतो. बाईक आडव्या तिडव्या जात होत्या. मावशी चिडायची. एका सिग्नल वर तिच्या आरश्याला एका बाईक चा हलकासा धक्का, धक्का पण नाही स्पर्श झाला… हि बाई भडकली ना…

कसे चालवतात पासून ते बंद केल्या पाहिजेत बाईक रस्त्यावरपर्यंत अशी तिची बडबड चालू झाली. मी म्हंटल थांबावं जरा मी माझा आयडी विसरलोय, राग- चेहऱ्यावर न दाखवता उतरलो. रिक्शाला हात केला, ऑफिस गाठलं.

दुसऱ्या दिवशी बाईक काढली. हेकलमेट होतंच.

रस्तयांचा बाजूला येऊन थांबलो, आज विकली ऑफ होता माझ्या तरी, ऑफिसच्या गेट वर आलो, एक फडतूस लाल गाडी येताना दिसली, मी माझ्या बाईक चा आरसा अड्जस्ट करून गाडीकडे पाहिलं.

बाईकची किस घेतली, ऍक्टिव म्युसिक चालू होत डोक्यात, लाल गाडी जवळ जवळ येत होती, तशी गेट च्या दुसऱ्या बाजूला, कुत्र्याची दोन लहान पिल्लं खेळत होती,

लाल गाडी जवळ आली, पिल्लं तिथेच होती, गाडी ने लेफ्टला वळायचा इंडिकेटर दिला होता, मी पण बाईक स्टार्ट केली, मला माझ्या बाईक वर विश्वास होता,
लाल गाडीने टूर्न केला तशी मी बाईक गाडीच्या उजव्या बाजूने खुप चिटकून अशी काढली कि गाडीचा आरास तुटेल, हे सगळं करत असतं, कुत्र्याची पिल्लं आणखी जवळ आली होती मी कचकन ब्रेक दाबला. पिल्लं बाजूला पाळली, एव्हाना, गाडीतून एक बाई उतरून आली होती, मी पट्कन गाडी तिथून पळवली, वॉचमन सारिका मॅम करत धावताना पहिला, मी थेट अन्नाच्या गाडीवर चहा प्यायला आलो होतो.

समोर तीच चार पाच मूल बाईक वरून स्लोमोशन मध्ये माझ्याकडे बघून टाळ्या वाजवत होते, एकाने तर चक्क सॅल्यूट केला, गाड्या पण हॉर्न बाजवून मला सलामी देत होत्या. पल्सरका, शाईनका, बुलेटका,युनिकॉर्नका सबका बदला लेगा रे तेरा फैझल !

मी माझ्या बाईक कडे पाहिलं, तिने आय लव यु म्हटलं,

मी- तुझ्यासाठी कायपणं !

                                                                         

                                                                          क्रमशः

                                                                                                -अविनाश सुरेश उबाळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा