पुणे : राष्ट्रीय महामार्गावरुन जाताना आता वाहन धारकांच्या गाडीवर फास्टॅग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसारच टोल नाक्यावर फास्टट्रॅकच्या माध्यमातून पैसे वसूल केले जातात. मात्र फास्टॅग योजना लागू केल्यानंतर आता टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. तर एका व्यक्तीने त्याची गाडी गेल्या १५ दिवसांपासून घराजवळच होती तरी त्याच्याकडून टोल वसूल करण्यात आल्याची तक्रार केली आहे.
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून २१ नोव्हेंबरपासून वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य आणि डिजिटल पेमेंट पद्धतीला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
आतापर्यंत बारा टोलनाक्यावरुन जाणाऱ्या ४० टक्के वाहनांवर फास्टॅग लावण्यात आला आहे. मात्र काही समस्येमुळे वाहनाधारकांना याचा त्रास होत आहे. आता जर वाहन मालक धारक न घेता टोल बूथवरून जात असेल तर खात्यातून शुल्क वसूल केले जात आहेत.
फास्टॅग हा चालकाने पाकिटात किंवा टोल नाक्यावर आल्यानंतर दाखवू नये असे सांगण्यात आले आहे. पण तो गाडीच्या पुढील काचेवर लावणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्याच आले. त्यामुळे गाडी टोल नाक्यावरुन जात असताना वर लावलेल्या सेन्सॉरने जर तुमच्या पाकिटातील किंवा अन्य ठिकाणी ठेवलेला फास्टॅग स्कॅन केला असल्यास खात्यामधून पैसे वसूल केले जाऊ शकतात. फास्टॅगच्या माध्यमातून वसूल करण्यात येणाऱ्या टोलचे पैसे किती कापले गेले आहेत. याचा सुद्धा आता चालकांना संदेश
येणार आहे.