अनिमेष कुजूर; भारताच्या वेगाच भविष्य

Animesh Kujur at Dromia Sprint Meet 2025` `India's fastest sprinter breaking records` `Animesh training at Reliance Foundation Odisha` `Indian athletics rising superstar`
अनिमेष कुजूर;

Animesh Kujur Indian Sprinter; भारतात सध्या एक शांत क्रांती घडत आहे धावण्याच्या शर्यतीतील क्रांती! आणि ही क्रांती करणाऱ्याचे नाव आहे अनिमेष कुजूर. वय वर्षे २२, छत्तीसगडचा हा तरुण धावपटू नुकताच ग्रीस येथील ड्रोमिया आंतरराष्ट्रीय स्प्रिंट आणि रिले स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.१८ सेकंदात धावला आणि त्याने राष्ट्रीय विक्रम मोडला.
हा क्षण भारताच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानाचा होता. खरतर जागतिक स्तरावर १०० मीटरचा विश्वविक्रम ९.५८ सेकंदांचा आहे आणि मागील ऑलिम्पिकमधील अंतिम शर्यतीत सर्वात कमी वेळ ९.९१ सेकंद आणि सर्वात जलद वेळ ९.७९ सेकंद होती.
पण भारतासाठी अनिमेषने १०.१ सेकंदात धावणे हे एक मोठे यश आहे, जे दाखवते की आपल्या देशात धावण्याच्या शर्यतीत मोठी प्रगती होत आहे.

अनिमेषची कहाणी;

अनिमेष यंदाच्या सुरुवातीला देहरादून येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी झाला, पण तो पूर्णपणे समाधानी नव्हता. कारण त्याचे ध्येय केवळ जिंकण नव्हत, तर राष्ट्रीय विक्रम मोडणे आणि आपला खेळ सुधारण हा होता. त्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली. त्याच्या या मेहनतीला आणि दृढनिश्चयाला यश मिळाले जेव्हा त्याने ग्रीसमध्ये १०० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला. यापूर्वी त्याने २०० मीटर शर्यतीत २०.४० सेकंदात धावून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता आणि नंतर तो आणखी सुधारून २०.३२ सेकंदांवर आणला. विशेष म्हणजे, एशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला. हे त्याचे पहिलेच आंतरराष्ट्रीय सामने होते, आणि तरीही त्याने इतकी मोठी कामगिरी केली.

फुटबॉलपासून धावण्यापर्यंत;

अनिमेषने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फुटबॉलपटू म्हणून केली होती. अवघ्या सहा वर्षांपूर्वी त्याने धावण्याच्या शर्यतीकडे गांभीर्याने वळण्याचा निर्णय घेतला होता मात्र आज तो भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे, आणि यामागे आहे त्याच्या प्रशिक्षक मार्टिन ओवेन्स यांचे मार्गदर्शन. ओडिशा रिलायन्स फाऊंडेशनच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असताना मार्टिन यांनी अनिमेषच्या कमकुवत बाजूंवर विशेष लक्ष दिले. मार्टिन सांगतात, “जेव्हा अनिमेष पहिल्यांदा माझ्याकडे आला, तेव्हा त्याला वळणावर चांगले धावता येत नव्हते. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वळणावरील तंत्रात बरेच काही चुकीचे होते.” त्याचबरोबर, त्याच्या सुरुवातीच्या वेगावरही काम झाले. यासाठी मार्टिन यांनी त्याला १०० मीटर शर्यतींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, जिथे त्याचा वेगवान अंतिम टप्पा (ज्यामुळे तो २०० मीटर शर्यती जिंकायचा) योग्य वेळी उपयोगी पडेल. अनिमेषच्या धावण्यात एक वेगळीच शैली आहे. त्याचा आत्मविश्वास, त्याची चाल, त्याचा स्वाभाविक आकर्षकपणा हे सगळे त्याला इतरांपासून वेगळे करते. त्याचा हा आत्मविश्वास बनावट नाही, तो त्याच्या मेहनतीतून आणि वेगातून येतो. जेव्हा तो शर्यत पूर्ण करतो, तेव्हा त्याचा वेग आणि ताकद पाहून सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. मग ती १०० मीटर असो वा २०० मीटर, अनिमेष प्रत्येक शर्यतीत आपली छाप पाडतो. अनिमेष कुजूरच्या यशाने भारताच्या धावण्याच्या शर्यतीत एक नवीन आशा निर्माण झाली आहे. त्याने मोडलेले विक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याची कामगिरी दाखवते की भारतीय धावपटू आता जागतिक स्तरावरही आपले नाव कमवू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे