कोल्हापूर : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. परराज्यातून येणारे मद्य रोखण्यासाठी सहा भरारी पथके, पाच चेकपोस्ट तैनात केले आहेत. ओपन बार, हुल्लडबाजी टाळण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मद्य प्राशनाचा एकदिवसीय परवाना मागणीसाठी झुंबड उडाली आहे. असे एकंदरीत चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.
पाच रुपयामध्ये देशी व विदेशी मद्य प्राशनाचे लायसन्स दिले जात आहे. त्यामुळे यंदा परमिट रूम १.३० वा. हॉटेल व बीअर बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. वर्षभरातील बऱ्या वाईट गोष्टींचा उजाळा देण्याचा दिवस. ३६५ दिवसांत काय कमावले आणि काय गमावले याचे आत्मपरीक्षण करण्याचे २४ तास. सरत्या वर्षाला निरोप देणे आणि आगामी वर्षाचे स्वागत करण्याची तयारी आबालवृद्धांनी केलेली असते. विशेष करून तरुणवर्ग नवनवे संकल्प करतो. काहीजण एकत्र येऊन साऊंड सिस्टीमच्या तालावर नाचत रस्सा पार्टी करतात. काही जण हॉटेलमध्ये पार्टीचे नियोजन करत असतात.
महाराष्ट्र शासनाचा महसूल चुकवण्यासाठी गोवा व कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने येणारे मद्य रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी तगडे नियोजन केले आहे. जिल्ह्यात सहा भरारी पथके तैनात केली आहेत. तसेच राधानगरी तालुक्यात दाजीपूर, आजरा, कागल-निढोरी, गगनबावडा, इचलकरंजी या पाच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे चेक पोस्ट नेमले आहेत. दिवस-रात्र गस्त घालण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
एक दिवसाचे लायसन्स देशीसाठी २ रुपये, तर विदेशीसाठी ५ रुपये ठेवले आहे. शंभर रुपयात १ वर्षे, तर १ हजार रुपये भरल्यानंतर आजन्म मद्यप्राशनाचा परवाना मिळतो. ऑनलाइन व ऑफलाइन आजन्म परवाना दिला जातो. त्यासाठी आधार कार्ड, २ फोटो व पत्ता असलेला एक पुरावा द्यावा लागतो. हा परवानाही चौकशी झाल्यानंतर ऑनलाइन उपलब्ध होता.
: ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. परराज्यातून येणारे मद्य रोखण्यासाठी सहा भरारी पथके, पाच चेकपोस्ट तैनात केले आहेत. ओपन बार, हुल्लडबाजी टाळण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मद्य प्राशनाचा एकदिवसीय परवाना मागणीसाठी झुंबड उडाली आहे. असे एकंदरीत चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.