मुंबई : सध्याची कर्लस मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘घाडगे & सून.’ ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
या मालिकेने नुकतेच ५०० भाग पूर्ण केले आहेत. मालिकेतील घाडगे कुटुंबीय प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसत होते.
या मालिकेत अक्षय, अमृता, माई, अण्णा, अक्का आणि कियारा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मालिकेतील अक्षय आणि अमृताची केमिस्ट्री, विचारी अक्का तसेच खलनायिकेच्या भूमिकेतील कियारा आणि वसुधा या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत होत्या.
‘घाडगे & सून’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे अमृताचे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोवरुन समोर आले आहे.