बीड : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, कॉमेडी भारती सिंग आणि फिल्म मेकर फराह खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिघींच्या विरोधात बीड शहरातील शिवाजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘बॅक बेंचर्स’ या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या पवित्र ग्रंथ बायबलमधील ‘हलेलूया’ या पवित्र शब्दाचा अश्लिल उच्चार करून ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या.
या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आल्फा ओमेगो ख्रिश्चन महासंघाचे राज्य अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुन्हा दाखल केला.
फराह खान, रवीना टंडन, भारती सिंग या तिघींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा घराबाहेर निघू देणार नाही, असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला आहे. तिघींना तत्काळ अटक करा, अशी मागणीही जोर धरत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे करीत आहे.