ट्रम्प–पुतीन अँकोरेज मीटिंग: तीन तासांच्या चर्चेत शून्य निकाल! भारतावर काय परिणाम होणार?

“Trump–Putin Anchorage meeting ends after three hours with no outcome – what will be the impact on India?”

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलास्कातील अँकोरेजमध्ये झालेली तासाभर नाही तर तब्बल तीन तासांची मॅरेथॉन बैठक कोणत्याही ठोस निकालाशिवाय संपली. चर्चेचा मुख्य अजेंडा युक्रेन युद्ध होता, पण ‘गेम चेंजर’ निर्णयाची जगाला अपेक्षा फोल ठरली. कारण स्पष्ट होतं—युक्रेनलाच चर्चेतून दूर ठेवण्यात आलं होतं!

जगभर या बैठकीकडे डोळे लागले होते. भारतात तर उत्सुकता दुप्पट होती, कारण ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चं तेल घेणाऱ्या भारतावर ५०% आयातशुल्क लादलं होतं. बैठकीआधीच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी आणखी शुल्कवाढीचा इशारा दिला होता. ट्रम्प यांचा युक्तिवाद—“भारताला जितका जास्त त्रास, तितका रशियावर जास्त दबाव.” पण भारताने दबाव झुगारून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.

आता प्रश्न असा, ट्रम्प भारतावरचा कर कमी करतील का? की आणखी वाढवतील? चर्चेनंतर त्यांनी शुल्कांवर पुनर्विचार करण्याचा इशारा दिला, पण उत्तरं अस्पष्टच ठेवली. दरम्यान, २५ ऑगस्टला भारत-अमेरिका व्यापार चर्चा पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये मोठा ‘ट्विस्ट’ होण्याची शक्यता आहे.

🚨 मोठी गंमत म्हणजे: ट्रम्पच्या ‘धमक्या’ पोकळ ठरतायत. भारत, चीन आणि रशिया एकत्र येऊन अमेरिकेच्या टॅरिफ पॉलिसीला ‘चॅलेंज’ करत आहेत. पुतीन यांच्या कणखरपणामुळे ट्रम्पना भूमिकेत माघार घ्यावी लागली, हे उघड आहे.

भारताचा जुना मित्र रशिया आजही मजबूत साथ देतो आहे, पण चीनशी तणावामुळे भारताला दोनदा विचार करावा लागेल. दुसरीकडे, अमेरिका अजूनही तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगाराच्या दृष्टीने भारतासाठी मोठा ‘प्लेयर’ आहे. त्यामुळे भारताने संतुलन साधणं अत्यावश्यक आहे.

दरम्यान, युरोपने स्पष्ट केलंय—“युक्रेनमध्ये न्याय्य शांतता प्रस्थापित होईपर्यंत रशियावर कठोर निर्बंध सुरूच राहतील.” ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी ट्रम्पच्या पुढाकाराचं कौतुक केलं असलं, तरी युक्रेनसाठी ठोस सुरक्षा हमीशिवाय काहीही मान्य होणार नाही, अशी अट घातली आहे.

युरोप-अमेरिका संबंध आधीच ताणले गेले आहेत. ट्रम्प युरोपच्या सुरक्षेसाठी पैसे खर्च करायला नकार देतात. त्यामुळे युरोप आता भारत, चीनसारख्या उदयोन्मुख शक्तींशी संबंध अधिक घट्ट करण्याच्या मूडमध्ये आहे.

न्यूज प्रतिनिधि भागा वरखडे