बारामतीत महिलेची फसवणूक करत बलात्कार

बारामती : महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवत नावावर नसलेल्या जमिनीची तिला नोटरी करून देत फसवणूक केल्याप्रकरणी पोपट दत्तात्रय चव्हाण (रा. खंडोबानगर, बारामती) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील सूर्यनगरी येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली. २०१६ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, जमिन खरेदी-विक्री व्यवहारातील रक्कम देण्याचा बहाणा करत आरोपीने फिर्यादीला विश्वासात घेतले. तिच्या पतीचे दारुचे व्यसन व तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी वेळोवेळी जबरीने शारिरिक संबंद प्रस्थापित केले.
कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना जीवंत राहू देणार नाही,असी धमकी दिली. तसेच त्याच्या नावावर नसलेल्या जमिनीची तिला नोटरी करून देत तिची फसवणूक केली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप अधिक तपास करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा