पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक रंगत आणणारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा २९ वा वर्धापनदिन सोहळा यंदा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे!
२३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे रंगणाऱ्या या भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रतिष्ठित कलाकारांना पुरस्कार प्रदान केले जातील, तर अशोक हांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात नाट्य आणि सिने विश्वातील तारे चमकणार आहेत :
- कै. बालगंधर्व पुरस्कार – श्री ज्ञानेश पेंढारकर (ज्येष्ठ नाट्य संगीतकार)
- आचार्य अत्रे पुरस्कार – संकर्षण कऱ्हाडे (अभिनेता, कवी, लेखक, निवेदक)
- कै. अरुण सरनाईक पुरस्कार – प्रवीण तरडे (अभिनेता, लेखक, दिग्दर्शक)
- कै. स्मिता पाटील पुरस्कार – स्पृहा जोशी (कवयित्री, अभिनेत्री, निवेदिका)
- कै. जयवंत दळवी पुरस्कार – अरविंद जगताप (नाट्य-सिने-मालिका लेखक)
याशिवाय पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि ज्येष्ठ गायक पं. सुरेश साखवळकर यांचा जीवन गौरव सन्मान करून विशेष सत्कार होणार आहे. तसेच सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप जम्माड देशमुख, संदीप बबलू जगदाळे आणि सोमनाथ तरटे यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल.
नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा २०२४ मधील विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.












































