पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे! चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील १९७६ मध्ये बांधलेला जुना पूल आता पाडण्यात येणार असून, त्याजागी अत्याधुनिक, आधुनिक आणि अधिक सुरक्षित पूल बांधला जाणार आहे.
अलीकडेच झालेल्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ मध्ये या पुलाची अवस्था धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने कार्यवाही करत रेल्वे विभागाकडून मंजुरी मिळवली आहे.
नवीन पूल तयार झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे. यामुळे चिंचवड परिसरातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटणार असून, विकासाला नवा वेग मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































