राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन व दहावा आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन महाविद्यालयात उत्साहात साजरा

श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन व दहावा आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ आर. एम. बागुल होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गौतम प्रकाशचंद्र वडनेरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात NSS कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “युवक हे राष्ट्राचे भविष्य असून समाजसेवा, स्वच्छता, आरोग्यजागरूकता व पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांतून युवकांनी सक्रिय सहभाग नोंदविणे हीच खरी देशसेवा आहे.”

आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. डॉ आर. एम. बागुल यांनी “आयुर्वेद – जगाला दिलेला भारताचा अनमोल ठेवा” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आयुर्वेदातील पंचमहाभूत सिद्धांत, रोगप्रतिबंधक जीवनशैली, औषधी वनस्पतींचे महत्त्व व आधुनिक वैद्यकीय शास्त्रात आयुर्वेदाचा वाढता उपयोग यावर सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान NSS स्वयंसेवकांनी समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रविंद्र श्रावणे यांनी केले. या वेळी NSS स्वयंसेवक, महाविद्यालयाचे प्रबंधक, सर्व विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, सहा. कार्यक्रमाधिकारी, महिला कार्यक्रमाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब श्री. संदीप सुरेश पाटील, सचिव ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील व उपाध्यक्ष सौ. आशाताई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


न्यूज अनकट प्रतिनिधी आत्माराम पाटील