टक्केवारीचे आरोप ‘बोगस’! उद्यान विभागाच्या ‘चेंजिंग रूम’मधील नाट्य ठेकेदार असोसिएशनचा आयुक्तांना लेखी खुलासा

पिंपरी महापालिकेच्या उद्यान विभागात टक्केवारी (कमिशन) मागितली जात असल्याच्या समाजमाध्यमांवरील आरोपांवर आता पडदा पडला आहे. ठेकेदार असोसिएशनने थेट महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना लेखी खुलासा सादर केला आहे. या पत्रानुसार, कामाचे बिल आणि मुदतवाढीसाठी कोणत्याही अधिकाऱ्याने टक्केवारीची मागणी केलेली नाही, तसेच अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही तक्रार केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे या आरोपांमागे वेगळेच कारण उघड झाले आहे.

मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले की, काही ठेकेदार कामात अनियमितता दाखवतात, त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. यामुळेच नाराज झालेले ठेकेदार खोट्या तक्रारी करत असतात. ठेकेदारांच्या लेखी खुलास्यामुळे ‘टक्केवारी’चा आरोप फोल ठरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे