श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (वाकड) उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या हंगामात कारखान्याचे गाळप पाच लाख मेट्रिक टन झाल्यास, शेतकऱ्यांच्या उसाला ३१५० रुपये प्रति टन दर दिला जाईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड करावी, ज्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. यासाठी कारखान्यामार्फत ठिबक सिंचनासाठी प्रतिएकरी ५००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, रिंगरोड आणि टीपी स्किमला शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधावर तसेच उसाला वाढीव दर आणि दिवाळीत साखर वाढवून देण्याच्या मागणीवर लोखंडे आणि माजी उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी उत्तरे दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































