अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा जोडी; जॉली एलएलबी ३ बॉक्स ऑफिसवर गाजली

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटानं देशांतर्गत तब्बल ९७ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे.

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनित हा चित्रपट जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा आधीच ओलांडला आहे. दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. प्रेक्षकांनी केलेली माऊथ पब्लिसिटी आणि सातत्यपूर्ण प्रेक्षक सहभागामुळे चित्रपटाला यश मिळत आहे.

चित्रपटानं पहिल्या दिवशी १२.७५ कोटी रुपयांचं कलेक्शन केले, तर वीकेंडमध्ये शनिवारी २० कोटी आणि रविवारी २१ कोटी रुपयांची कमाई झाली. आठवड्यातील मधले दिवस नेहमीच कठीण असतात; सोमवारी कलेक्शन ५.५ कोटी रुपयांपर्यंत खाली आलं, मात्र मंगळवारी तिकिटांच्या किमती कमी केल्यामुळे चित्रपटानं पुन्हा गती मिळवली आणि ६.५ कोटी रुपयांची कमाई केली. बुधवारी ४.५ कोटी आणि गुरुवारी ४ कोटी रुपयांची कमाई नोंदवली गेली.

दुसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटानं गती कायम ठेवली. नवव्या दिवशी ६.५ कोटी, दहाव्या दिवशी ६.२५ कोटी आणि अकराव्या दिवशी २.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. बाराव्या दिवशी कलेक्शनमध्ये थोडी वाढ झाली आणि १२ व्या दिवशी चित्रपटानं ३.७५ कोटी रुपयांची कमाई केली.

सध्या हा चित्रपट ईशान खट्टरच्या ‘होमबाउंड’ आणि पवन कल्याणच्या ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटांशी स्पर्धा करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील