औरंगाबाद उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ

औरंगाबाद: शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले. त्यासाठी मंगळवारी निवडणूक झाली. औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत एमआयएम मध्ये फूट पडल्याचे समोर आले.

मंगळवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, कॉंग्रेसकडून अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून शेख जफर असे उमेदवार होते. यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जंजाळ यांना मतदान केले. जंजाळ यांना ५१ मते पडली. भाजप पुरस्कृत मलके यांना ३४ तर एमआयएमचे जफर यांना १३ मते मिळाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मते फुटल्याची चर्चा आहे. एमआयएम पक्षाचे तीन मध्ये फुटले असून यातील दोन मते शिवसेनेला तर एक मत भाजप पुरस्कृत उमेदवारला पडले.

शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांना एमआयएमच्या 2 नगरसेवकांनी मतदान केले तर एका नगरसेवकाने भाजप पुरस्कृत उमेदवार गोकुळ मलके यांच्या पारड्यात मत पडले. काँग्रेसचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. तर उपस्थित असलेल्यांपैकी एक नगरसेवकाने भाजप उमेदवाराला मतदान केले. राष्ट्रवादीचे २ नगरसेवक उपस्थित होते तर २ गैरहजर होते. उपस्थितांनी शिवसेनेच्या उमेदवार जंजाळ यांना मतदान केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा