पुणे : पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव स्पोर्ट्स ॲथलेटिक्स ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या माधुरीताई शिरोळे स्मृती कनिष्ठ गट मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. ६ ते ८ ऑगस्टदरम्यान झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत दमदार कामगिरी केली.

या स्पर्धेतून डेरवण येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे कार्यकारिणी सदस्य सचिन आडेकर आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आबा जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संघटनेचे सहसचिव विजयकुमार बेगळे, संजीव कुलकर्णी, गुरवन्स कौर, चंद्रकांत पाटील, रोहित घाग, नितीन दुबे, शेखर कुदळे, विष्णू कुदळे, किरण उत्तेकर, अंकुश घुगे, मनीषा चपने, पूर्णिमा जाधव, अभय पोद्दार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रमुख निकाल
२० वर्षांखालील मुले – ११० मीटर अडथळा शर्यत
- प्रथम – नंतर जूठलिंगे – १५.७१ सेकंद
- द्वितीय – अथर्व कामटे – १९.१० सेकंद
- तृतीय – इंद्रजीत इंगळे – २६.०२ सेकंद
२० वर्षांखालील मुले – २०० मीटर धावणे
- प्रथम – अर्णव कदम – २१.८४ सेकंद
- द्वितीय – क्षितिज चिंगारी – २१.९० सेकंद
- तृतीय – सोहम जवळकर – २२.७६ सेकंद
२० वर्षांखालील मुले – ८०० मीटर धावणे
- प्रथम – प्रतीक पवार – २:०४.०६
- द्वितीय – समर्थ भागवत – २:०४.९२
- तृतीय – अंकुश शेटे – २:२१.२६
२० वर्षांखालील मुली – २०० मीटर धावणे
- प्रथम – कृष्णाली जगताप – २६.३३ सेकंद
- द्वितीय – जान्हवी चोरगे – २७.०४ सेकंद
- तृतीय – सेजल सापटे – २७.६८ सेकंद
१८ वर्षांखालील मुले – २०० मीटर धावणे
- प्रथम – अर्जुन देशपांडे – २२.३१ सेकंद
- द्वितीय – शिवराज काळे – २२.९२ सेकंद
- तृतीय – सोहम पवार – २३.४७ सेकंद
१८ वर्षांखालील मुली – २०० मीटर धावणे
- प्रथम – यशश्री सपकाळ – २५.७५ सेकंद
- द्वितीय – आस्वी टकले – २६.८१ सेकंद
- तृतीय – दिव्या घोडेकर – २६.९२ सेकंद
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संधी मिळणार असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी













































