शिवानी सुर्वेला हिंदी मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान

मुंबई : ‘जाना ना दिल से दूर’ या हिंदी मालिकेतील शिवानी सुर्वेला मालिकेतील भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हि मालिका इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये डब होऊन प्रसारित झाल्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवरही शिवानीची चांगलीच फॅनफॉलोविंगही वाढला आहे.
त्यामुळे शिवानीला नुकताच व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या हिंदी मालिकेसाठी गौरविण्यात आले.
पुरस्कार घेततयानंतर शिवानीने सांगितले की, व्हिएतनाममध्ये पाऊल ठेवल्यापासून मला भरभरून प्रेम मिळाले. तिथली माझी फॅनफॉलोविंग पाहून मी खूप भारावून गेले. ‘जाना ना दिल से दूर’ इथे खूप लोकप्रिय मालिका असल्याचे मला माहित होते. ह्या मालिकेमूळे माझा एवढा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला असेल, हे स्वत: पाहणे, त्यांचे प्रेम अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
मला मिळालेले अवॉर्ड हे माझ्या ह्या चाहत्यांच्याच प्रेमाचेच प्रतिक आहे. व्हिएतनामला मी पहिल्यांदाच गेले होते. आणि आता माझ्या चाहत्यांनी तिथली थोडीशी भाषाही शिकवली आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे शिवणीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा