हार्दिक पंड्या झाला एन्गेज

नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघातील ऑलराऊंडर फलंदाज हार्दिक पंड्याने चाहत्यांना आपल्या एन्गेजमेंटची बातमी दिली आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना चांगली बातमी मिळाली आहे.

सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक एन्गेज्ड झाले असून, स्वत: हार्दिकनेच याबाबत इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
दुबईत एका स्पीडबोटीवर हार्दिकने नताशाला प्रपोज केलं. “मै तेरा, तु मेरी, सारा हिंदुस्तान,” असं हार्दिकनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अजून एक क्रिकेटर लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

तसेच नताशानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हार्दिकनं केलेल्या प्रपोजलचा व्हीडिओ शेअर केला आहे. तिनं हार्दिकसोबतचे काही फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून ‘Forever Yes’ असं म्हटलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा