मुंबई : मुंबई येथील वांद्रे पोलिसांनी एका व्यापाऱ्याला २५ वर्षीय तरुणीच्या लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक केली आहे. या व्यक्तीने अत्यंत लज्जस्पद कृत्य केले आहे. त्याने आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर मेणबत्तीने हल्ला केला आहे. आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे.
६० वर्षीय व्यक्तीची ओळख पटली असून सलीम कुरैशी असे त्याचे नाव आहे.सोमवारी अटक केल्यानंतर पोलिसांनी सलीम कुरैशी याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या शनिवारी (दि.२८) रोजी २५ वर्षीय महिला हॉलमध्ये झोपली होती. तेव्हा आरोपी तिच्याशी लैंगिक चाळे करु लागला. त्यानंतर त्याने मेणबत्तीने मोलकरणीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.
याबाबत हिंदुस्तान टाइम्स दिलेल्या बातमीनुसार, हा हल्ल्यानंतर त्या तरूणीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तश्राव होऊ लागला. त्यानंतर कुरैसीने २५ वर्षीय जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, या तरुणीने आपल्याबाबत घडलेल्या घटनेला वाचा फोडली. गेल्या डिसेंबर महिन्यापासून ही तरुणीने या व्यक्तीच्या घरात काम करणे सुरू केले होते. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांनी पोलिसांशी संपर्क साधला. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत सलीम कुरैशी याला अटक केली आहे.