“पॉर्न” पाहण्यात भारत नंबर वन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३०० हून जास्त ‘पॉर्न’ वेबसाईट्सवर बंदी घातलेली असतानाही भारतातील लोक ‘पॉर्न’ पाहण्यात आघाडीवर आहेत, असे एका ‘पॉर्न’ वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
विशेष म्हणजे भारताने या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकले असून पॉर्न पाहणाऱ्यांनी संख्या येथे फक्त दोन वर्षांत वाढली आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराची पातळीही वाढली आहे.
‘पॉर्नहब’ या वेबसाईटने सर्वेक्षण केल्यानंतर सादर केलेल्या अहवालात ही बाब निदर्शनास आली आहे.
या अहवालानुसार, हिंदुस्थानात २०१७ मध्ये मोबाईल आणि स्मार्टफोन्सवर ८६ टक्के लोक ‘पॉर्न’ पाहात होते. २०१९ या वर्षअखेर म्हणजे केवळ दोनच वर्षांत येथे ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांची संख्या ३ टक्क्यांनी वाढून ८९ टक्के गेली आहे.
‘पॉर्न’ पाहण्यामागे भारतापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. वास्तविक अमेरिका हा जगात सर्वात मोठा देश आहे. तरी तेथील केवळ ८१ टक्के लोकच ‘पॉर्न’ पाहतात असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर ब्राझिल हा देश आहे. तेथे ७९ टक्के लोक ‘पॉर्न’ पाहतात. मग युरोपीय देश (७४ टक्के) चौथ्या आणि जपान (७० टक्के) पाचव्या स्थानावर आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा