अमेरिका : अमेरिकेतील इलिनॉयसमध्ये राहणाऱ्या एका वेट्रेसच्या २०२० या वर्षाची सुरुवात शानदार झाली आहे. एका ग्राहकाने दिलेल्या टिपमुळे ती लखपती झाली.
अमेरिकन गायक आणि अभिनेता डॉनी वाह्लबर्ग याने वेट्रेसला तब्बल दीड लाख रुपयांची टिप दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर #२०२०tipchallenge सुरू आहे.
या चॅलेंजमध्ये डॉनीने सहभाग घेतला. ज्यामध्ये वर्षाच्या आकड्यानुसार टिप ठेवणे बंधनकारक असते.
डॉनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या पत्नीसोबत सेंट चार्ल्स येथील IHOP रेस्टोरंटमध्ये गेला होता. यावेळी या दोघांनी ७८ डॉलर म्हणजे ५,५९७ रुपयांचे जेवण केले.
डॉनीने हे बिल भरल्यानंतर २०२० डॉलर म्हणजेच १लाख ४० हजारांची टिप ठेवली.
या टिपमुळे त्यांना जेवण देणारी वेट्रेस डेनिएल फ्रेंजोनी प्रचंड खुश झाली.
जेनीने या बिलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याची मोठी चर्चा रंगली आहे.