दोहा : महाराष्ट्रामधील बीडचा गुणवंत लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळेने पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियोतील ऑलिम्पिक वारीसाठी तिकीट मिळवले. त्याने दोहा येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल कामगिरी करत ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला.
आता तो पुरुषांच्या ३ हजार मीटर ट्रिपलचेस प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे . तो ट्रिपलचेसमध्ये भारताकडून खेळणारा महाराष्ट्राचा पुरुष गटातील पहिला आणि ओव्हरऑल दुसरा धावपटू ठरला. आता त्याने जागतिक स्पर्धेत या गटात १३ वे स्थान गाठले आहे.
ललिताने ऑलिम्पिकचे स्पर्धेत केले प्रतिनिधित्व यापूर्वी ऑलिम्पियन ललिता बाबरने हा पराक्रम गाजवला. तिने २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिक स्पर्धेत स्टिपलचेसमध्ये सहभागी होऊन नववे स्थान गाठले होते. अाता अविनाश या गटात धावणार आहे.
पुरुष वाॅक रेस गटात जपान संघाने जिंकली तिन्ही पदके जपान संघाने पुरुषांच्या वाॅक रेस गटात क्लीन स्वीप दिले. या गटातील तिन्ही पदके जपानच्या धावपटूंनी जिंकले. यात तोशिकाजू यामानिशीने सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.